पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७) भावे नाट्यमंदिर : मराठीमधील आद्य नाटककार कै. विष्णुदास भावे यांच्या नावाने १९४२ साली स्थापन झालेली ही एक मान्यवर नाट्यसंस्था आहे. सांगलीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेली प्रशस्त जागा, भव्य रंगमंच आणि उत्कृष्ट ध्वनिव्यवस्था ही या नाट्यमंदिराची वैशिष्ट्ये आहेत. नाट्यक्षेत्रातील मान्यवर व्यक्तीला प्रतिवर्षी विष्णुदास भावे यांच्या नावाने संस्थेतर्फे समारंभपूर्वक सुवर्णपदक दिले जाते. आचार्य अत्रे, रांगणेकर, वसंतराव कानेटकर, जयमाला शिलेदार, जोत्स्ना भोळे अशा नाट्यक्षेत्रातील अनेकांना आजवर अशी सुवर्णपदके दिली गेली आहेत. कोणत्याही नाट्यसंस्थेला प्रथम प्रयोग करण्यासाठी संस्थेतर्फे उतेजन म्हणून नाट्यमंदिर विनामूल्य दिले जाते. १८) नूतन बुद्धिबळ मंडळ, सांगली : सांगली शहराला बुद्धिबळाची गौरवशाली परंपरा आहे याचा अलेख आधी आला आहेच. पण या अद्भूत खेळाची पद्धतशीर जोपासना करण्याचे आणि खेळाला नवीन नवीन खेळाडू मिळवून देण्याचे फार मोठे काम गेली ६० वर्षे 'नूतन बुद्धिबळ मंडळ' ही संस्था करत आहे. या कार्यातील सिंहाचा वाटा मंडळाचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान, श्री. न. व्यं. तथा भाऊसाहेब पडसलगीकर हे आहेत. अलीकडेच 'कॉमनवेल्थ चेस चैंपियनशिप - २०००' या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून, मंडळाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला आहे. २३ डिसेंबर १९४१ रोजी, सांगलीमधील, भाऊसाहेब राजवाडे, दाजीसाहेब दीक्षित आणि सोपानदेव शिंगारे यांनी 'नूतन बुद्धिबळ मंडळ' सांगली या संस्थेची स्थापना केली. बुद्धिबळ खेळाचा प्रसार करणे, प्रचार करणे, स्पर्धा भरविणे, खेळाचे वाङमय जमविणे, स्थायी स्वरुपी इमारत मंडळासाठी बांधणे अशी अद्दिष्टे ठेवून मंडळाचे कार्य सुरू झाले. सुप्रसिद्ध कवी आणि नामवंत बुद्धिबळपटू, साधुदास तथा गोपाळराव मुजुमदार, विनायकराव खाडिलकर, बाबासाहेब बोडस या जुन्या अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेने 'प्रविण' (Expert) खेळाडूंच्या स्पर्धा भरविण्यास १९४२ पासून सुरूवात केली. १९४९ पासून 'मास्टर्स मेमोरिअल स्पर्धा' भरविण्यास सुरुवात झाली. १९५५ पासून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 'सदर्न मराठा कंट्री चेस' स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित करण्यास सुरुवात केली. १९६८ मध्ये सुप्रसिद्ध अद्योगपती, वसंतराव वैद्य यानी दिलेल्या भरघोस देणगीमुळे, त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ, कै. श्रीधर केशव वैद्य स्पर्धा, प्रथमच राष्ट्रीय पातळीवर भरविण्यास सुरुवात झाली. त्यामुळे देशातील आघाडीचे नामवंत खेळाडू या स्पर्धेसाठी सांगलीत येऊ लागले. अशाच देणग्या मिळवत मंडळाने १९६९ पासून १९ वर्षाच्या आतील मुलांसाठी आणि १९७६ नंतर महिला खेळाडूंसाठी खुली महिला स्पर्धा भरविण्यास सुरुवात केली. एकूण स्पर्धांच्या अनुभवातून आणि बुद्धिबळाविषयी, मुलांच्या मनात, सांगली आणि सांगलीकर... . २५५