पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या शाळेत होती. या शाळेतील जुने फलक शोधले तरी विविध क्षेत्रांमध्ये स्पृहणीय यश मिळविणाऱ्या अनेक सांगलीकरांची नावे त्यात आढळतील. त्यांची नावे केवळ विस्तारभयास्तव देता येत नाहीत. १ एप्रिल १९५३ पासून ही शासकीय शाळा तंत्रशिक्षण देण्याच्या अटीवर, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीकडे हस्तांतरीत झाली. तेव्हापासून या शाळेला वेगळेच वैभवशाली स्वरूप प्राप्त झाले आहे. या शाळेच्या सुसज्ज आणि भव्य वर्कशॉपमध्ये कारपेंटरी, फिटींग, टर्निंग, स्मिथी व मोल्डिंग आणि वायरींग असे अनेक विभाग आहेत. वरील ६ तंत्र विषयांबरोबरच 'इंजिनिअरींग' हा विषय शिकविला जातो. अलीकडे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, बिल्डिंग मेंटेनन्स, अँटो. इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी अशा अनेक विषयांचे वेगळे विभाग सुरु झाले आहेत. एकविसाव्या शतकात अपयुक्त ठरेल अशी गुणवत्ता जपणाऱ्या या शाळेत, आजमितीला जवळजवळ तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या शाळेला शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःचे असे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. ११) सिटी हायस्कूल : आज नव्वदीकडे वाटचाल करणाऱ्या सिटी हायस्कूलची स्थापना ४ डिसेंबर १९१४ रोजी झाली. सर्वश्री सखदेव, विनायकराव जोशी, तोरो आणि चिकोडीकर या चार तरुणांनी, अवघ्या एका विद्यार्थ्याला घेऊन ही शाळा सुरू केली. आजमितीला या भव्य शाळेत दोन हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १९२१ साली या शाळेची पहिली तुकडी मॅट्रिकच्या परीक्षेला बसली. १९२६ मध्ये, या शाळेच्या एका विद्यार्थ्याने मॅट्रिकच्या परीक्षेत शाळेला पहिली शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून दिली, तेव्हापासून शाळेची गौरवशाली परंपरा अखंडितपणे चालू आहे. तो विद्यार्थी म्हणजे न्यायमूर्ती राम केशव रानडे. १९६३ मध्ये शुभांगी सबनीस या विद्यार्थिनीने एस.एस.सी. परीक्षेत, संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. १९८७ मध्ये एकाच वेळी शाळेचे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. वसंतराव वैद्य, जे.एल. रानडे, गजाननराव वाटवे, मामा पेंडसे, चित्तरंजन कोल्हटकर, अशोक जी. परांजपे, आचार्य वि.प्र. लिमये, माधव खाडिलकर, भाग्यश्री ठिपसे, हरी नाना पवार, विष्णू सावर्डे, अक्षरवेडा र. कृ. जोशी, डॉ. सुभाष भेंडे, कल्याण शेटे, डी. टी. ओतारी अशा या शाळेच्या काही नामवंत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आणि शाळेचा लौकिक वाढवला. आणि या गुणी विद्यार्थ्यांची ज्यानी जडण-घडण केली, त्या गुरूजनांची नावे किती आणि कोणाकोणाची म्हणून घ्यायची ? अच्च शैक्षणिक परंपरा असलेले सिटी हायस्कूल आपली जन्म शताब्दी या सहस्रकामध्ये मोठ्या डौलाने, आणि प्रतिष्ठेने साजरी करील यात काय शंका ? सांगली आणि सांगलीकर.. . २५१