पान:समता (Samata).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कौमार्य नष्ट झाले, काचेचे भांडे फुटले, चारित्र्यहनन झाले अशा चुकीच्या समजुती डोक्यात घेवून, घाबरून जावून आत्महत्येसारखे मार्ग मुलींनी अवलंबू नयेत. म्हणून सर्व मुलींना गर्भपाताचा आरोग्य हक्क आहे आणि तो गुन्हा नाही. शासनमान्य गर्भपात केंद्रामध्ये सुरक्षित, कायदेशीर आणि गोपनियता सांभाळून गर्भपात होवू शकतो याची माहिती प्रत्येक मुलीला असली पाहिजे.

  • शिक्षेची तरतूद...

सदर कायद्याचे उल्लंघन आढळल्यास आय.पी.सी. कलम ३१२ ते ३१८ नुसार संबंधीत पोलीस स्टेशनमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांनी गुन्हा दाखल करायचा आहे. संबंधीत गरोदर महिला, हॉस्पिटल, नातेवाईक, एजंट यांच्यावरती दखलपात्र, अजामीनपात्र, नॉन-कंपाऊंडेबल गुन्हा दाखल होऊ शकतो. सदर गुन्ह्यासाठी ७ वर्षे सक्तमजुरी आणि रु. ५०,०००/पर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

  • तक्रार कोणाकडे कराल ?

जिल्ह्यात गर्भपाताच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा सल्लागार समिती अस्तित्वात आहे. गैरप्रकार आढळल्यास अगर उल्लंघन आढळल्यास जिल्हाशल्य चिकित्सका मार्फत पोलीस स्टेशनमध्ये प्रकरणाची पूर्ण चौकशी करुन गुन्हा दाखल करता येतो. लेक लाडकी अभियान शिरुर (का) (४)