पान:समता (Samata).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लक्ष्मीमुक्ती - मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा ७/१२ उतान्यास पुरुषांबरोबर स्त्रीयांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, परिपत्रक क्रमांक : एस १४/२१६१८१६/प्र.क्र. ४८५८/ल-६ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक १५ सप्टेंबर १९९२ परिपत्रक स्त्रीयांचे हक्क सुरक्षित रहावे या दृष्टीने काही सामाजिक संघटनांनी सुचविल्या प्रमाणे शासन सर्व संबंधीतांना असे आदेश देत आहे की, एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वत:च्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा ७/१२ च्या उता-यावर स्वत: बरोबर सह हिस्सेदार म्हणून नोंद केली अशी स्वेच्छेने विनंती केल्यास, महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील कलमांच्या अधिन राहून फेरफार नोंदी बाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तशी नोंद घेण्यास हरकत नाही. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सही (व.ल.गवई) उपसचिव लेक लाडकी अभियान शिरुर (का) (३३)