पान:समता (Samata).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • शिक्षेची तरतूद •••

| या कायद्यानुसार वरील कोणताही गुन्हा घडल्यास १ ते ५ वर्षापर्यंतची कैद आणि रुपये १०,००,०००/- पर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. * तक्रार कोणाकडे कराल? जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये अथवा सायबर गुन्ह्यांसाठी तयार करण्यात आलेले स्वतंत्र पोलीस कक्षाकडे लेखी, इंटरनेटव्दारा, फोनव्दारा तक्रार दाखल करु शकतो. स्वसंरक्षणासाठी खबरदारीच्या सूचना । १. ऑनलाईन माहितीची देवाण-घेवाण काळजीपूर्वक करावी परिणामकारक आणि अवघड पासवर्ड वापरुन आपले अकाऊंट सुरक्षित ठेवावे. सोशल नेटवर्किंग साईटस् वर फार जास्त वैयक्तिक तपशील टाकू नयेत. त्याचा गैरवापर होऊ शकतो. व्यावसायिक कामासाठी वेगळा, आणि वैयक्तिक वापरासाठी वेगळा असे दोन ईमेल पत्ते असल्यास सुरक्षेच्या दृष्टीने अधिक चांगले. सोशल नेटवर्किंग साईटस् वरील मित्रपरिवार नीट पारखून करावा. पिकनिक, पाट्य आणि छायाचित्रे शक्यतो ऑनलाईन टाकू नयेत. हॉटेल किंवा मॉल्सच्या चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा, किंवा दोन्ही बाजूला बसवलेले आरसे नाहीत ना ते तपासून पाहावे. वापरात नसताना वेबकॅमचा प्लग काढून ठेवा. सायबर गुन्ह्यांची तक्रार दाखल करण्यासाठी न घाबरता पुढाकार घ्या. ॐ ॐ ॐ ॐ लेक लाडकी अभियान शिरुर (का) (२८)