पान:समता (Samata).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तिला/त्याला जाणून बुजून आत्महत्या करायला प्रवृत्त करणा-याला जास्तीत जास्त १० वर्षांपर्यंत तुरुंगवास अथवा जन्मठेप आणि दंडाची शिक्षा भारतीय दंड संहिता ४९८ (अ) प्रमाणे होऊ शकते.

  • तक्रार कोणाकडे कराल?

सासरच्या व्यक्तींनी हुंडा मागितल्यास अथवा पीडित महिलेला हुंड्यासाठी शारीरिक किंवा मानसिक छळाला कंटाळून आत्महत्त्या करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला, महिला तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार करू शकते. लेक लाडकी अभियान शिरुर (का) (१६)