पान:समता (Samata).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| बालविवाह प्रतिबंधक कायदा १९२९

  • कायदा काय सांगतो

सदर कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण । झाल्याशिवाय मुलीचे लग्न करण्यात येऊ नये आणि २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलाचे लग्न करण्यात येऊ नये. १८ वर्षाखालील मुलीचे लग्न आणि २१ वर्षाखालील मुलाचे लग्न केल्यास तो बाल विवाह आहे. बाल विवाह थांबविण्यासाठी ग्रामीण स्तरावर 'ग्राम बाल संरक्षण समिती कायद्याने गठीत करणे बंधनकारक केले आहे. | ग्रामसेवक/अंगणवाडी बाईने वस्तुस्थितीची माहिती करून घेवून बाल संरक्षण समितीच्या सहकार्याने संबंधितांचे मत परिवर्तन करून १८ वर्षापर्यंत मुलीचे व २१ वर्षापर्यंत मुलाचे लग्न करणार नाही. अशा आशयाचे पत्र दोन्हीकडील पालकांकडून घ्यावे. | संबंधित पोलीस स्टेशनने सदर गुन्हा दखलपात्र असल्याने संबंधित कायद्याचे उल्लंघन करणा-या व्यक्तीला गुन्हा दाखल करून ताब्यात घ्यावे. तसे न झाल्यास त्वरीत जवळच्या पोलीस ठाण्यात दोन्हीकडच्या पालकांविरुद्ध तक्रार दाखल करावी. | ऐन मांडवात कारवाईची वेळ पोलीसांवर आल्यास ज्या ठिकाणी लग्न सुरू आहे त्या जागेचा मालक, जेवण बनविणा-यापासून ते हॉल सजविणा-यापर्यंत, मंदिर असल्यास त्याचे ट्रस्टी, व-हाडी, भटजी, वाजंत्रीवाले या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात येतील.

  • शिक्षेची तरतूद•••

बालविवाह प्रतिबंधक कायदा १९२९ च्या कलम ३ नुसार २१ वर्षाखालील वयाच्या पुरुषाचे तसेच १८ वर्षाखालील वयाच्या मुलीचे लग्न लेक लाडकी अभियान शिरुर (का) (१३)