पान:समता (Samata).pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिकार २०१३

  • कायदा काय सांगतो

माणूस म्हणून जन्माला आल्यावर प्रत्येकाला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे. म्हणूनच राष्ट्रीय अन्न अधिकार २०१६ हा कायदा पारित करण्यात आला आहे. बालकांना, स्तनदा मातांना, गरोदर मातांना अंगणवाडीत पोषण आहार मिळतो. मधल्या सुट्टीत शाळेत जाणाया मुला-मुलींना जेवण दिले जाते. पिवळ्या रेशन कार्डवर रेशनच्या दुकानात स्वतः धान्य उत्तम दर्जाचे देणे बंधनकारक आहे. सर्व लाभार्थीपर्यंत सवलतीच्या दरात, उत्तम प्रतिचे धान्य पोहचविणे आणि त्यासाठी अशा लाभार्थी कुटुंबाची यादी करणे आणि त्यांना अन्नधान्य पुरविण्याच्या सुचना जारी करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. लेक लाडकी अभियान शिरुर (का)