Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हे जग नाही आहे की जेथे असमानता आहे तेथे तणाव आणि अशांती आहे. विचार करा आणि बोला तुम्ही आणि तुमचे मित्र मैत्रिणी, तुम्हाला काय खायला आवडतं? जे तुम्ही खाताय ते आरोग्याला योग्य आहे असे तुम्हाला वाटते का? तस नसेल तर तुम्ही मित्र मैत्रिणी एकत्र बसा आणि दिवसभर खाण्याची यादी तयार करा, जी पौष्टीक असेल आणि चविष्ट ही असेल, आणखीन एक गोष्ट आहे. आम्ही महागड्या खाण्याची गोष्ट करत नाही . तेच पदार्थ जे स्थानिक ठिकाणी घरगुती पद्धतीने आपण वापरतो आणि आपल्याला मिळतात. या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला इतर कोणाबरोबरही स्पर्धा करायची नाहीए, तर स्पर्धा तुमची तुमच्या बरोबर आहे. तुम्ही खास आहात. तुम्ही निर्णय करायचाय . सुधारण्याचा, पुढे जाण्याचा.पटतंय का मी काय म्हणते ? ते तसं असेल, तर मग सकारण स्पष्ट करा. आता जरा शांतपणे बसा आणि विचार करा, जी तुमच्या कडे काय खास प्रतिभा आहे, कौशल्य आहे जे तुम्हाला वाढवावंसं वाटत विकसित करावसं वाटतं. __ 92