________________
दलित, आदीवासी, अल्पसंख्यांक आणि विकलांग युवकांची परिस्थीती आणि त्यांच्या अडचणी | आपल्या समाजात जातीच्या नावावर ७० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही जातीभेद केला जातो. दलित युवकांची परिस्थिती आणि अनुभव वेगळे आहेत. गरीबी सोबतच अजूनही काही ठिकाणी अस्पृष्यता सोसावी लागते. शाळा किंवा इतर ठिकाणी अपमानीत व्हावे लागते. वेगळे बसविले जाते. यांना आयुष्यात पुढे जाण्याची चांगली संधी कमी मिळते. दलित युवकांचे लैंगिक शोषण ही केले जाते. हीच परिस्थिती आदिवासी युवकाची आहे. आदिवासी विभागात विकास, शिक्षण, आरोग्याची कमतरता आहे. कित्येक वेळा नवीन धरणे आणि तत्सम प्रकरणामुळे आपले घर दार सोडवे लागते. आपल्याच देशात त्यांना आश्रीता सारखे रहावे लागते. हमें विकास । शिक्षा और स्वास्थ्य 8 में बराबरी
- मिले ।।
हीच परिस्थिती गरीब मुस्लीम, ख्रिश्चन युवकांना अनुभवास मिळते. शाळेत नोकरीच्या ठिकाणी त्यांच्यावर भेदभाव केला जातो. काही युवकांमध्ये जेव्हा शारीरीक किंवा मानसिक समस्या किंवा व्यंग आहेत त्यांनाही ब-याच गोष्टी सोसाव्या लागतात. आजही त्यांच्या साठी सोयी सुविधा आणि संधी नाहीत. ते चेष्टेचा विषयच बनविले जातात.