या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
युवकांना सगळ्यात आनंद कधी मिळते ? आपल्या आवडीचे जेवण, दारु पिणं, लैंगिक संबंध करणं, कष्ट करुन पैसे मिळविणे, चांगल्या मित्रांना भेटणे, आत्मसन्मान मिळविणे, या पैकीकोणती गोष्ट केल्याने तरुणांना, युवकांना जास्त आनंद मिळतो ? | कॉलेजच्या युवकांना विचारल्यास समजलं की सर्वात जास्ती त्यांना त्यांचा सन्मान केलेले आणि कौतुक केलेले आवडते. त्यांना वागण्या बद्दल, यशाबद्दल त्यांचे कौतुक केलेले आवडते. म्हणजे चांगले काम, चांगले वागणं आणि यश आनंद देतात. आणि आपल्या भविष्य काळाचा पायाही घातला जातो.