या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
आता आत्मपरिक्षण करा आणि तुम्ही पण बोला या सगळ्या गप्पा ऐकून तुमच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे मिळतात का तुम्हाला? तर मग शोधा अशी व्यक्ती जिच्याशी सहजपणे सगळ्यागोष्टी सांगू शकता आणि विचारू शकता. असे उदास बनून मनातले प्रश्न मनात ठेवू नका. एकटेपणाने मन बिचारं होवून जाईल, थकून जाईल.
- मुला मुलींच्या होणा-या शारिरिक बदलावर चर्चा करणे गरजेचे आहे. ही चर्चा मुक्त आणि खुलेपणाने करणे गरजेचे आहे. ही चर्चा मुक्त आणि खुलेपणाने केली पाहीजे. म्हणून तुम्हाला गरजेचं वाटलं तर मुलींचा गट वेगळा आणि मुलांचा गट वेगळा करुन आपण चर्चा करुया.
- या बदलामुळे तुम्ही परेशान आणि अस्वस्थ होता का? तसे असेल तर या अस्वस्थपणाची कारणे शोधा. तुम्ही तुमच्या समवयस्क मुलां-मुलीपेक्षा वेगळे दिसताय का? तुमच्यातील बदल इतरांपेक्षा अधिक गतीने होतोय असे वाटते का?आणि त्या संदर्भातील माहीती आपणाकडे पुरेशी नाही. त्यामुळे गोंधळून जायला होतं, परेशान व्हायला होतं कां? या पैकी कोणतेही कारण असेल तर थोडे थांबा
आणि विचार करा. एखादया विश्वासातील व्यक्ती बरोबर चर्चा करा. याच पुस्तकाचे मागील पान पुन्हा वाचा ,बघा परेशानी दूर होते का? तो लगे रहो मुन्ना भाई-मुन्नी बहने.