Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जसे कि सुंदर म्हणजे गोरे आणि बारिक, सिनेमातल्या हिरोहिरोईन, मॉडेल सारखे. गोरा रंग प्रत्येकाचा असु शकत नाही. गोरी मुलं गव्हाळी बनु इच्छितात तर गव्हाळी मुलं गोरी बनु इच्छितात. या जाहिरात किशोरी अवस्थेतील मुलांमध्ये हीन भावना आणि व्दंव्द निर्माण करतात. तुम्हाला सौंदर्याचा खरा आणि गहीरा अर्थ समजला पाहिजे. । | काय आहे सौंदर्य? आम्हाला वाटतं सुंदर म्हणजे आरोग्यदायी, कणखर आणि मजबूत. निसर्गाने जे शरिर आम्हाला दिले आहे ते नटवावंसं वाटणं स्वाभाविक आहे. परंतु खरं सौंदर्य आपल्या चारित्र्यात, विचारात, कृतीत आहे. चांगले विचार आणि चारीत्र्य आपल्या चेह-यावर दिसत असतात त्यामुळे आपणं सुंदर दिसतो. काही माणसं केवळ उंच आणि गोरे आहेत म्हणून तुम्हाला आवडतात का? त्यामुळे तुम्ही प्रभावीत होता का? शारिरिक सौंदर्य आज आहे, उदया नाही. म्हणून मित्रांनो, चेहरे चमकवण्यासाठी धडपडणे पुरेसे नाही. तुम्हाला आपले चारीत्र्य आणि व्यक्तीमत्व घडवायचेय. bare