पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चली जीवनाचे काही नियम समजून घेऊया मिळून-मिसळून जगण्याची केली आत्मसात करुयी किशोर अवस्थे बाबत चर्चा करत असताना एक ध्यानात घेतले पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये काही नियम आणि काही कायदे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. निसर्गाच्या या नियमांना समजणं आणि स्विकारणं यातच शहाणपण आहे. जर छोटे, मोठे, सगळेच नियम आणि कायदे स्विकारतील आणि त्यानुसार वागतील तर खुप सारी भांडणे, ताण, तणाव, रुसणे, फुगणे संपून जाईल. - नियम पहिला - निरंतर बदल १CH | आपल्या आत आणि बाहेर सतत बदल घडत असतो. एकच गोष्ट नाही बदलत, ती गोष्ट म्हणजे बदल. प्रत्येक सेकंदाला, मिनिटाला, तासाला बदल घडत आहे. दुपार, सकाळ, संध्याकाळ, उन्हाळा, पावसाळा सतत परिवर्तन. काहीच स्थिर नाहीए.