Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाळीशी संबधीत अनेक गैर समज आहेत. म्हणून पाळी विषयी नीट समजून घेतले पाहीजे. पाळी ही जैवकीय म्हणजेच नैसर्गीक प्रक्रीया आहे. पाळी सुरु झाली म्हणजे मुलगी आई होऊ शकते. प्रत्येक महिन्याला मुलीचे अंडकोश गर्भधारणेसाठी एक अंड तयार करत आहे. गर्भाशयामध्ये देखील गर्भ वाढविण्यासाठी आच्छादन तयार केले जात आहे. परंतु पुरूषाकडून शुक्रजंतु अंडयासोबत मिलनासाठी न आल्यामुळे मुलीमध्ये तयार झालेले अंडे आणि गर्भाशयाला तयार झालेले आच्छादन दोन्ही पाळीच्या स्वरुपात शरिराच्या बाहेर फेकले जातात. ही प्रक्रीया २१ ते ३५ दिवसात होते. याला आपण पाळी असे म्हणतो. आपल्यासाठी खालील गोष्टी समजुन घेणे गरजेचे आहे. * पाळीचे रक्त अशुद्ध नसते. * पाळी येणे हे अपवित्र किंवा शिवता शिवतेचा काही संबंध नाही. * या दरम्यान मुली आंघोंळकरू शकतात. आपले दैनदिन कामे करु शकतात. कोठेही येऊ जाऊ शकतात. * पाळी दरम्यान शारिरिक स्वच्छता खूप महत्वाची ठरते. { "