या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
स्वतःची योग्यता,कौशल्य जसं शिकावं लागतं तसंच स्वतःकडे त्रयस्थपणे पाहायला शिकावं लागतं आणि शिकण्यासाठी वेळ आणि प्रयत्न आवश्यक आहेत. जाणीवपूर्वक यासाठी संस्कार करावे लागतात. चांगल्या सवयी आणि चांगले संस्कार चुटकी वाजल्यावर लगेच मिळत नाही. साक्षीभावाने जीवनाकडे पहावे ही चांगल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. एकदा का जर ही जीवनाची गुरुकिल्ली सापडली तर तुमचे जीवन सफल होवून जाईल .मन शांत होईल. करुन बघा, करा आणि मिळवा. | मैत्रीणींनो, या गोष्टी समजल्या, शिकल्या तर जीवन कौशल्य समजलं. चांगले संबंध बनतील. नाती तयार होतील, आव्हानांचा तुम्ही सामना करु शकाल आणि एका चांगल्या भविष्याची पायाभरणी होईल. आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. 'आप्पो दीपो भव'.स्वतःच १ स्वतःचे दीपक बना. 51