________________
जेव्हा तुम्ही आपल्या विचारांना आणि मनोविकारांना साक्षीदार बनवून त्यांच्या पासून दूर जावून पाहू शकता. तेव्हा त्याचे विश्लेषण नीट करू शकता. मग तुम्ही रागाच्या आधिन जात नाही. राग का आला? याचा तुम्ही शांतपणे विचार करू शकता. तुम्ही आक्रमक होत नाही, श्वासाची गती वाढत नाही, तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता. रागाला तुमची मदत मिळत नाही. आगीत तेल ओतले जात नाही, रागाचे बीज पडते पण त्याचा वृक्ष होवू शकत नाही. त्याला आपल्या भावनांचे सिंचन मिळत नाही. राग मदत मिळावी म्हणून खुप प्रयत्न करतो, ते बीज वाढत नाही. तिथेच नाहीसे होते. हे फक्त तुम्ही रागाचे साक्षीदार झालात, स्वतःचे नियंत्रण घालवू शकला नाहीत, तरंच शक्य आहे. तुमची सारी दुखं ,ताण, अडचणी, भावना आणि विचार यांचे गुलाम झाल्यामुळे निर्माण होतात. बहुतेक लोक आपल्या हातापायावर नियंत्रण ठेवू शकतात, पण मनावर नाही. मनात . जे येईल ते. आता तुम्ही रागाचे गुलाम नाही, मालक आहात. राग तुमचा गुलाम आहे.