पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विचार आणि भावना इतरांना सांगत असतो म्हणून इतरांचा विचार व भावना समजून घेत असतो. संवाद साधता येणे ही एक कला आहे. विचार पूर्वक आपण या कलेत पारंगत होऊ शकतो आणि नाती अधिक चांगली बनवू शकतो. संवादासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण एकमेकांचा आदर करणे, आपल्या आणि इतरांच्या अस्तित्वाला महत्त्व देणे. जिथे परस्पर आदर आणि समानता आहे तिथे विश्वास निर्माण होतो आणि संवाद प्रभावी ठरतो. | इमानदारी, प्रामाणिकपणा संवादामध्ये मदत करतो.आपण बोलणे आणि भाषेतील संवाद तर साधतोच पण त्याच बरोबर चेहरा, हावभाव, हात यांचा वापर करून संवाद साधता येतो. याला म्हणतात शारिरीक भाषा. आपण एखाद्याचे हावभाव, चेहरा, शरिर बघून सांगू शकतो की त्यांना आपले बोलणे आवडले? चांगले वाटलेय, नाराज | आहेत की चिंतीत आहेत? परंतू हो, शरिराची भाषा, प्रत्येकवेळी नीट समजणे सोपे नाही. चूक पण होऊ शकते, कारण प्रत्येकाची शारिरीक भाषा सारखी नसते. संवाद करताना आपल्या शारिरीक भाषेवर लक्ष दिले पाहिजे. आपले खांदे हालवून, बोलण्याकडे लक्ष न देऊन, अपमानकारक हासून तुम्ही समोरच्याला नाराज करू शकता. ही शारिरीक भाषा बघून तुम्ही त्यांच्याशी असहमत आहात, त्यांचे विचार तुम्ही ऐकत नाही, त्यांचा तुम्ही अपमान करताय हे त्यांना कळून चुकेल.