पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५. भावनात्मक समज आणि भावनांचा सकारात्मक ताळमेळ - भावनात्मक समज म्हणजे आपल्या आणि इतरांच्या भावनांना समजून घेणे आणि त्या प्रमाणे वर्तन करणे, ही गोष्ट बौद्धिक समज असण्यापेक्षाही अधिक महत्वाची आहे. कारण माणूस हा फक्त बौद्धीक प्राणी नाही तर भावनात्मक पण आहे. आणि किशोर अवस्थेत तर भावनांमध्ये चढ उतार अधिक होत असतात. याच वयात आयुष्यात बरेच बदल घडत असतात. तुमच्या कडून खूप ) अपेक्षा केल्या जातात. आपला मूड या भावनांमुळेच तर बनतो. न तणाव, राग, ईर्षा, प्रेम, घृणा, दोष, कुतुहल, असहाय्यता या सगळ्या भावना आहेत. या भावनांना समजून ) न घेता त्यात वाहून जातो. तोंडात येईल ते बोलून टाकतो. जसं की राग आला की, आपला तोल जातो. आपल्या लक्षातच येत नाही की आपण काय बोलतो, काय वागतो. काही लोक ओरडतात, दुस-यावर किंवा स्वत:वर हिंसा करतात. कित्येकदा मन असं नाराज-नाराज रहातं. दु:खी रहातं कोणाशी बोलु नये असे वाटते. कधी एकदमच उत्साही बनतं. सगळया दुनियेच्या गळ्यात गळे घालून नाचावसं वाटतं. कधी काही विषयी अचानक प्रेम वाटायला लागतं तर कधी राग यायला लागतो. हे सारे भावनांचे खेळ आहेत.