पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या बदलामुळे आई-वडिल आणि घरातील व्यक्ती यांचे बरोबरचं ही नातं बदलत असतं. तुमच्या घरातल्या लोकांनी तुमच्यातला हा बदल समजून घेतला, तुमच्या बदलत असलेल्या व्यक्तीमत्वांचा आणि विचारांचा आदर केला, तुमच्याशी वागताना समानतेने आणि बरोबरीने मान देत वर्तन केले तर तुमचं नातं त्यांच्या सोबत बिघडत नाही. पण जर तसं घडलं नाही तर कुटुंबातल्या नात्यामध्ये तणाव रहातो, कलह निर्माण होतो. परस्पर सामंजस्य, नातं चांगलं ठेवण्याची जबाबदारी मोठयांची पण आहेच, पण इथे तर आम्ही तुम्हालाच सल्ला देवू शकतो. तुम्ही आपल्या घरातल्या मोठ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा, की ते तुमच्या हिताची आणि संरक्षणाची काळजी करतात. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीशी तुम्ही सहमत नसाल तर ते तुम्ही शांतपणे, इमानदारीत स्पष्टपणे त्यांच्या समोर सांगा. आपलं म्हणणं त्यांना समजून सांगायचं असेल तर चर्चा सुरु ठेवा. आक्रमक होणं, एकदम चिडणं, मोठयाने बोलणे उपयोगाचं नाही. जर राग आलाच तर दिर्घ श्वास घ्या, १० पर्यंत आकडे मोजा, मगच तोंड उघडा. _ 29