पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीवन कौशल्य म्हणजे ज्ञान आणि बोध ज्यामुळे सकारात्मक विचार करता येतो आणि संकटापासून वाचण्यासाठी शक्ती मिळवता येते. शाळेतल्या परीक्षेत चांगले मार्क पाडल्याने जीवन कौशल्य प्राप्त होत नाही तर हे प्राप्त होतं जीवनातच आपल्या अनुभवातून. आपल्या व इतरांच्या अनुभवातून आपण शिकायच ठरविलं आणि त्यावर विचार करायचा ठरविला तर खूप गोष्टी शिकता येतील. आपल्या चूकाही आपल्याला खूप गोष्टी शिकवितात. चूका आपल्या गुरू आहेत, जर आपण शिकायच ठरविलं तर. म्हणूनच म्हटलं आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जीवन कौशल्य ही जीवनभर शिकायची गोष्ट आहे. पण जे आयुष्यभर शिकायचे ठरवतात ते आयुष्य परिपूर्ण समजत नाहीत. त्यांच्याकडे नम्रता असते. जे जीवनभर स्वत:ला शिष्य समजतात. कोणाकडून ही शिकण्याची तयारी ठेवतात ते जीवनभर शिकत रहातात. पुस्तकातून शिका, निसर्गाकडून शिका, जीवनाकडून । शिका, मोठयांकडून शिका, लहानांकडून शिका. _ 21