Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीवनकौशल्य म्हणजे जेवणातील मीठ, मीठ जसे जेवण स्वादिष्ट बनविते पण दिसत नाही किंवा ऑक्सीजन जो आपल्या अवती भोवती आहे, आपल्याला जीवन देतो पण दिसत नाही. जीवन कौशल्य तसंचं आहे.दिसत नाही, पण आपलं जीवन सहज सुंदर आणि सोपं बनवितं. आव्हानांचा सामना करण्याची हिंमत आणि धाडस देते. लोकांशी चांगले नाते तयार करण्याची कला शिकवते. आपल्याला जबाबदारी आणि संयम शिकवते. जीवन कौशल्य आपल्याला काय करावं, कसं करावं, कधी करावं याचं भान देते. जीवन कौशल्य अडचणी आणि अडथळे दूर करायला मदत करते. आव्हान स्विकारण्याचं आणि जीवनात जिंकण्याचं बळ देते. आपल्या जीवनाची नाव वादळ वा-यामधून सहीसलामत कशी चालवायची त्याचं कौशल्य शिकवते. नाविक हवेचा रोख बदलू शकत नाही. पण आपल्या नावेवरील शिड हवेच्या दिशेने कशी वल्हवायची ते शिकता येते, त्यालाच म्हणतात जीवन कौशल्य आपण इतरांना किंवा अवती भवतीच्या वातावरणाला सहजपणे बदलू नाही शकत, पण नावाड्या प्रमाणे आपल्या विचाराची पद्धती बदलून पुढे जाण्याचा मार्ग शोधू शकतो.