पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीवन कौशल्य जगावं तर कसे जगावें ? शाळेतल्या शिक्षणात जास्त मार्क पाडणारे सर्व लोक सफल आणि प्रसिद्ध व्यक्ती नाही बनू शकल्या. या व्यक्ती त्या आहेत ज्यांना जीवन जगावं कसं याची कला अवगत झाली. या कलेलाच म्हणतात जीवन कौशल्य, जीवन कौशल्य फक्त चांगलं शरीर, बुद्धीमत्ता, चांगलं शिक्षण आणि पैसे कमविण्याशी संबंधित नाही. या बरोबरच भावनात्मक आणि सामाजिक कौशल्ये आणि योग्यता शिकणे आवश्यक आहे.

  • आपले ज्ञान, प्रतिभा, मुल्य आणि व्यवहार आपल्या रोजच्या जीवनात आपण कसे वापरावे?
  • जीवनात सामोरे येणा-या आव्हानांचा आणि । समस्यांचा सामना कसा करावा आणि संधीचा लाभ कसा घ्यावा ?
  • आपली विचारशक्ती आणि विश्लेषण कसे वाढवावे ? जीवनात त्याचा वापर कसा करावा?

आपल्या