पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोठे लोक तुमच्यावर नाराज झाले तर तुम्ही त्यांना समजवून घेवून त्यांची नाराजी दूर केली पाहीजे. हे विसरु नका की मोठी माणसं देखील जीवनातल्या अडचणींमुळे परेशान असू शकतात. त्यांच्यावर खूप साच्या जबाबदा-या असतात. त्यामुळे कधी कधी ते आपल्या घरातील लहानग्यांवर आपला राग काढतात. वडील आईवर रागवतात, आई मुलांवर रागवते, मुले धाकटया भावंडावर रागवितात, छोटी मुले कुत्री -मांजरी अशा पाळीव प्राण्यांवर आपला राग काढतात. परस्परांच्या नात्यां मधील समजुतदार पणा आणि सचेपणा हाच सुखी जीवनाचा आधार आहे. आपआपसातला विचार आणि संबंध हेच जीवनाचे आधार आहेत