पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

> चली मठी माणसांचे काय म्हणणं आहे बघू या. बयाच लोकांचं म्हणणं असतं की, युवा पिढीचं चुकतंयं. मोठया माणसांचं वागणं आणि बोलणं नेहमीच बरोबर असतं, असं आमचं म्हणणं नाहीए. आमचा अनुभव असे सांगतो की मोठी माणसं आमच्यावर प्रेम करतात. आमच्या भल्याविषयी चिंता करतात. पण कित्येक वेळा युवा पिढीला मोठी माणसंच त्रास दायक ठरतात. मोठया माणसांना परिवर्तन आवडत नाही. होणा-या बदलांची त्यांना भिती वाटते. ते आपले तरुणपण विसरतात. आपल्या आई वडीलांच्या विरुद्ध ते वागले ,आपल्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला, त्याचा त्यांना विसर पडतो. त्यांची अपेक्षा असते की, मुलांनी त्यांच्याच पद्धतीने जगले पाहिजे, वागले पाहिजे. जर सगळे वातावरण बदलले आहे, तर जगण्याची रित, पद्धतीही बदलणारच ना. घरातल्या मोठ्यांनी पण परिवर्तन समजून घेतले पाहिजे आणि स्विकारले पाहिजे. ....:::::