पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाहिजे तर तुमचे कर्तव्य आहे की, तुम्ही ही इतरांचे ऐकून घेतले पाहीजे, त्यांनाही बोलू दिले पाहिजे. मुलींना हिंसा आणि छेड छाड न होता रस्ता आणि बस मध्ये प्रवास करण्याचा अधिकार आहे. जर पुरुषांनी आपले कर्तव्य निभावले, मुलींसोबत हे चुकीचे वर्तन टाळले आणि हिंसा केली नाही तरच हे शक्य आहे. तुम्हाला अधिकार आहेत त्या सोबत जबाबदा-या ही आहेत. हेच वय आहे एका चांगल्या जीवनाची आणि भविष्याची जबाबदारीने पायाभरणी करण्याची. अधिकार अणि कर्तव्य एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.