पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३. मुले, किशोरी आणि युवक यांचे अधिकार आणि अस्मिता आई, बाप आणि शिक्षक यांना मुलांना मारण्याचा अधिकार नाही. किशोरी आणि युवकांना जीवनाचे सत्य समजून घेण्याचा अधिकार आहे. आपल्या जीवनाचा निर्णय स्वतः घेण्याचा त्यांना अधिकार आहे. जीवनावश्यक सेवा, सुविधा मिळणे इत्यादींचा अधिकार आहे. मोठ्यांनीही आपल्या इच्छा त्यांच्यावर लादू नयेत, त्यासाठी त्यांचे शोषण करु नये. शोषण म्हणजे केलेल्या कामाला योग्य दाम न देणे, लहान मुलांकडून कामे करून घेणे, शारीरिक, मानसिक छळ करणे, घाबरवणे, अपमानित करणे, लैंगिक त्रास देणे, इत्यादी. परंतू प्रत्येक अधिकारासोबत कर्तव्य येतेच. तुमचे अधिकार असतील ते तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही कर्तव्य पार पाडाल. तुम्ही कर्तव्य पार पाडल्याशिवाय इतरांना त्यांचे अधिकार मिळणार नाहीत. तुमचे आई-वडील त्यांचे कर्तव्य पार पाडतात. तुम्हाला मारत नाहीत, आपले कर्तव्य निभावतात म्हणून तुम्हाला तुमचे अधिकार मिळतात. आई वडिलांचा ही अधिकार आहे की कोणत्याही कटकटी शिवाय, त्रासाशिवाय तुम्ही त्यांना जगू दयावे. जर तुमचे ऐकून घेतले _ 10