पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२.आज बहुतेक देशांनी स्त्री-पुरूष समानतेचा स्विकार केला आहे. स्त्रियांना आणि मुलींना आपल्या मर्जीनुसार शिक्षण, नोकरी आणि लग्न करण्याचा अधिकार आहे. त्यांना लैंगिक आणि मातृत्वा संदर्भातील हक्क प्राप्त झाले आहेत. त्यांच्यावर जबरदस्तीने कोणत्याच गोष्टी लादता येणार नाहीत. समानता म्हणजे सारखेपणा नव्हे. मुलगा-मुलगी एकसारखे नाहीत.त्यांच्यात फरक आहेत,पण ते समान आहेत. बरोबरीचे आहेत, त्यांचे अधिकार सारखे आहेत.उंच आणि बुटके,काळे आणि गोरे, वेगवेगळ्या जातीतले आणि धर्मातले लोक जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे अधिकार सारखे असले पाहिजेत. समान अधिकार मिळण्यासाठी एकसारखे असणे गरजेचे नाही.