Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आमचे म्हणणे आहे की, या वयातील मुला मुलींनी शरीर संबंध करता कामा नये. छोट्या वयातील संभोगामुळे खुप नुकसान होवु शकते नको असलेले गरोदरपण तुम्हाला अडचणीत आणू शकते. लहान वयातील मुलींची बाळे नविन प्रश्न तयार करतात. गर्भपात करावा तर आरोग्याला घातक ठरु शकतो. म्हणुन आमचे म्हणणे आहे की तुर्त या वयात कविता वाचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. विवीतल्या छोट्या भळ्या भाबड्या मित्रांनी | हवे तेवढे मित्र बनवी है। ॐ हवी तेवढी जर्जवेची लपंडाव खेळी बेखुप प्पिी अवां, यिनी कवी, गणी म्हणी,पण आत्तीचे सेक्से कळु नका, | अविष्यासाठी काहीतवी वेळुिन ठेवा. परंतु, आमच्या या चर्चेनंतर आणि कवितेनंतरही तुम्हाला लैंगिक संबंध ठेवावे वाटलतर आपल्या साथीदारासोबत सविस्तर चर्चा करा.तुम्हाला आत्ताच हा संबंध महत्वाचा का वाटतो? इतकी घाई कशाची आहे, विचार न करता डोळे बंद ठेवुन लैंगिक संबंध ठेवणे ही नादानी आहे. कोणाच्या ही दबावाखाली येवुन किंवा मित्रांचे प्रकार बघुन लैंगिक संबध ठेवणे बेजबाबदार आणि खतरनाक ठरु शकते दोघेही एकत्र बसा, पुर्ण विचार करा मग पावले उचला. _137