पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

5 काही अर्थ आणि अधिकार | हेच जीवनाचे आधार इथे आम्ही स्पष्ट करु इच्छितो की, आपल्या गप्पा या काही आदर्श आणि मुल्यांवर आधारीत आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून या आदर्शाचा आणि त्याच्याशी संबंधित अधिकार आणि जबाबदा-या आम्ही प्रत्येक युवतीच्या जीवनात फुलताना पाहू इच्छितो. आमचा विश्वास आहे की आमचे हे आदर्श आपले जीवन सुंदर आणि सफल करतील. जगभरातील बहुतेक सर्व समाज खालील तीन आदर्शानुसार चालतात आणि बहुतेक देशांनी याच आदर्शानुसार आपले कायदे बनविले आहेत. १. प्रत्येक माणसाला मानवाधिकार आहेशमान इज्जत व अधिकार प्रत्येक जण समान आणि स्वतंत्र आहे.प्रत्येकाला अस्मिता आणि प्रतिष्ठा आहे. आज कोणीही माणुस ज्याला अधिकार नाहीत त्याला अपमानित करता येईल, त्याचे शोषण करता येईल असे नाही. पण त्या TS अधिकारासोबत कर्तव्य ही आहेत.