पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वस्तु पोहचतात. घरी स्त्रिया कष्ट करुन स्वयंपाक बनवितात म्हणून आपली भूक भागते. साधी आपली भूक ; पण केवढी मोठी साखळी आहे, भूक भागवण्यासाठी आपण परस्परांना जोडलेले आहोत आणि अवलंबून आहोत. प्रत्येक माणसाच्या बाबतीत आणि प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत हे सांगता येईल. हे जोडलेलं असणं आणि अवलंबून असणं सुंदर आहे. आज आपण या जगात आहोत ते आपल्या आईवडीलांमुळे आणि त्यांच्या आधीच्या पिढीच्या साखळीचा आपण एक भाग आहोत. एका मोठ्या साखळीची आपले जीवन ही एक कडी आहे आणि आपले जीवन इतरांवर अवलंबून आहे. परस्परांवर अवलंबून असण्याला आणि जोडलेलं असण्याला खूप गंभीरपणे समजून घेतले पाहिजे. आपल्या जीवनातील इतरांचे योगदान समजून घेतले पाहिजे आणि आदर केला पाहिजे. म्हणूनच आपल्या अधिकारा बरोबरच आपल्या जबाबदारीचे आपल्याला भान असले पाहिजे. तरच जीवनाची मजा आगळी वेगळी आहे हे समजेल.