पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपण विविधता समजून घेतली तरच एकता तयार होईल आणि मग सहजीवन सुंदर होईल. आपण अनेकतेमध्ये एकता निर्माण करुन एकत्र सुंदर जीवन जगू शकू. आपण आता जीवनाचा दुसरा नियम शिकलो विविधता. नियम -३ आमचं एकमेकांशी जोडलेलं असणं आणि आमची आत्मनिर्भरता जगामध्ये कोणीच व्यक्ती आत्मनिर्भर नाही, कोणीच असू शकत नाही. आपण निसर्गावर अवलंबून आहोत. निसर्गाशी जोडलेले आहोत. मुलं मोठयांवर अवलंबून आहेत. गुरु शिष्यांशी जोडलेले आहेत. आपल्या अनेक गरजा इतरांच्या मदतीनेच पूर्ण होतात. जसे आपले जेवण, जे शेतक-यांनी निर्माण केलेल्या धान्यामुळे होवू शकते. व्यापारी, दुकानदार, ट्रकवाले, भाजीवाले यांच्यामुळेच आपल्यापर्यंत