Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काही करण्यापूर्वी आपण कोणाच्या दबावाखाली येवून काही करत नाहीना, याचा विचार करा. ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटतात त्याच गोष्टी तुम्ही करताय ना? तुमच्या मर्जीशिवाय कोणालाही (घरातील पुरुष किंवा बाहेरचे ) तुमच्या शरीराला हात लावण्याचा अधिकार नाही. प्रत्येक चुकीच्या स्पर्शाला तुम्हाला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. नाही म्हणताना दृढतापूर्वक नाही म्हणावं लागेल. ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे असली स्टाईल चालणार नाही. तुम्ही है निट समजून घ्या. तुमच्या शरीरावर फक्त तुमचा अधिकार आहे. तुमच्या शरीराबाबत तुम्हाला काय माहीतीय? लैंगिक आजार, एच.आय.व्ही. बाबत ? व्यसनां विषयी काय माहिती आहे ? माहिती नसेल तर समजून घ्या. चर्चा करा. समन आणि जबाबदारी घेण्यासाठी ज्ञान आणि माहिती आवश्यक आहे. सुंदर आणि बरोबरीचे मजबूत नाते तयार करण्यासाठी मुलांना आपला आखडूपणा ,खोटी मर्दानगी सोडावी लागेल. 111