पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भेदभावाचा अर्थ उच्च निच, चांगला-वाईट, बरोबर-चूक. निसर्गाने विविधता निर्माण केली, निसर्ग नाही म्हणाला की, गुलाब हा झेंडू पेक्षा जास्त सुंदर आणि महान आहे; पुरुष हे स्त्रियांपेक्षा महान आहेत; गोरे लोक काळयांपेक्षा चांगले असतात; उंच लोक बुटक्यांपेक्षा सरस आहेत. हे सर्व उच्च -निच भेदभाव समाजाने म्हणजेच आपण बनविले आहेत. विविधता, फरक आवश्यक आणि सुंदर आहे, पण भेदभाव चूक आहे. | सगळं कसं एक सारखं असायला हवं, असं आपलं म्हणणं नाहीए. विविधता समजून घेतली पाहिजे, स्विकारली पाहीजे आणि सांभाळली पाहीजे. आपल्या पेक्षा वेगळ्या माणसांना, वेगळ्या धर्माच्या, रंगाच्या, लिंगाच्या माणसांना समजून घेतले पाहिजे आणि त्यांचा आदरही केला पाहिजे. जेव्हा आपण आपल्यापेक्षा वेगळ्या माणसांना समजून घेतो, त्यांचा आदर करू तेव्हाच तेही आपल्याला समजून घेतील, आदर करतील.