Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांना बदललं जावू शकत नाही. यासारख्या व्याख्या करुन समाजात शोषण आणि असमानता कायम राखली जावी या साठी षडयंत्र रचले जाते. परंतू आता हे स्पष्ट झाले आहे की समस्त भेदभाव माणसाने म्हणजेच समाजाने निर्माण केले आहेत. स्त्री पुरुष संबंधाच्या संदर्भाने सामाजिक लिंगाची अवधारणे मागील ही जैविक व सामाजीक कारणे स्पष्ट पणे समोर आणून समाजात त्याला आव्हान देत आहेत.ही अवधारणा सांगते आहे की, मुला मुलींमध्ये,श्री युकांमध्ये श्रीयण व पुरुषपण हे समानाकडून लादले जाते. म्हणून ते बदलूही शकते. मित्रांनो, तुम्ही या सामाजिक लिंगाची गंभीरता समजून घ्या. आपले वर्तन आणि आपला विचार तपासा. कुटुंबात आणि समाजात स्त्री- पुरुष असमानता आपल्या सर्वांचे नुकसान करते. कुटुंबात आणि समाजात निर्माण करण्यात आलेली असमानता सर्वांचेच नुकसान करत आली आहे. समाजामध्ये मुलींची संख्या कमी होत आहे. लाखो मुली गर्भ स्वरुपात गायब केल्या जातात. श्रीमंत शिकले सवरलेले, वरच्या जातीतील लोकच या सर्वांत अधिक गुंतलेले दिसतात. 101