पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भाषा विभाग आणि साहित्य मंडळाचा दुवा-मध्यस्थ म्हणून मी काम करू इच्छितो. त्यासाठी संवादाचा पूल मला बांधायचा आहे. त्यास शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी माझी अपेक्षा आहे.
 मित्रहो, चला आपण मराठी रसिक, लेखक, शासन आणि महामंडळाचे प्रतिनिधी सारे मिळून मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी व अभिव्यक्तीचे माध्यम होण्यासाठी प्रयत्न करू या! तुमची रजा घेताना माझी-तुमची मराठीबाबतची जी भावना आहे, ती सुरेश भटांच्या गीताच्या खालील ओळी सांगून व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो.

'लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगता माय मानतो मराठी
आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरांत वाढते मराठी

 धन्यवाद !

◆◆◆



५२ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन