पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे. येथे पुन्हा मी आपल्या सर्वांच्या व राज्यशासनाच्या नजरेस तामिळ व कन्नड विद्यापीठाचा संदर्भ देतो. तंजावर येथे नऊशे एकर एवढ्या विस्तीर्ण जागेवर १९८१ मध्ये तामिळ विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या विद्यापीठात तामिळ ही सर्व विद्यांसाठी ज्ञान भाषा व्हावी म्हणून आर्ट्स अंतर्गत शिल्पकला, संगीत वे नाटक विभाग, मॅन्युस्क्रिप्टॉलॉजीचा विभाग, तामिळ भाषा विकासातंर्गत तसेच 'Department of Tamil Studies in Foreign countries' 31041, समाज विज्ञान, शिक्षण आदी विषय तर 'भाषा' अंतर्गत साहित्य, तत्त्वज्ञान, लोककला, आदिवासी संशोधन व अन्य भारतीय भाषा असे अनेक विभाग आहेत. या विद्यापीठाला सुसज्ज असा विज्ञान विभागही आहे. त्यात प्राचीन विज्ञान, सिद्धऔषधी, उद्योग व अर्थ सायन्सेस, कॉम्प्युटर सायन्स, आर्किटेक्चर, पर्यावरण आणि हर्बल सायन्स आदी विभाग आहेत. हा तपशील यासाठी मी देत आहे की, तामिळ विद्यापीठाची व्याप्ती किती मोठी आहे व तामिळ भाषा सर्वार्थाने ज्ञानरोजगाराची व्हावी यासाठी शासन किती आग्रही आहे. हंपी येथे स्थापन झालेल्या कन्नड़ विद्यापीठाचे पण धोरण असेच कन्नड ज्ञानभाषा करण्याचे आहे.
 तामिळी जनता व कोणत्याही पक्षाचे असले तरी सरकार स्वभाषेविषयी कमालीचे आग्रही आहे, हे सिद्ध करण्यासाठी जागतिक तामिळ संमेलन' 'The World Tamil Conference' चा दाखला पुरेसा आहे. पहिले संमेलन १९६६ मध्ये कौलालंपूर येथे, दुसरे चेन्नई (१९६८) तिसरे मॉरिशस (१९७०) चौथे जाफना (१९७४), पाचवे मदुराई (१९८१), सहावे पुन्हा कौलालंपूर (१९८७) येथे झाले. सन २०१० मध्ये एम. करुणानिधी मुख्यमंत्री असताना, कोईमतूरला सातवे संमेलन झाले, त्यासाठी तब्बल पाचशे कोटी रुपये सरकारने खर्च केले होते!

 या उदाहरणावरून तामिळनाडू स्वभाषेच्या विकासासाठी किती जागरूक व कार्यतत्पर आहे हे दिसून येते. या पार्श्वभूमीवर मी या मंचावरून राज्य सरकारकडे त्वरित मराठी विद्यापीठ स्थापण्याची मागणी करीत आहे. मराठीचा आद्यग्रंथ मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधू' ज्या अंबाजोगाई गावी निर्माण झाला, तिथे तो स्थापन व्हावा ही मराठी भाषकांची इच्छा आहे. तामिळ व कन्नड विद्यापीठाचा अभ्यास करून मराठी विद्यापीठाचा आराखडा बनवावा आणि तो याच २०१८-१९ यो आर्थिक वर्षात सुरू व्हावा अशी मी आग्रहाने मागणी करतो, त्याला आपण सारे उपस्थित मराठी रसिक पाठिंबा द्याल, याची खात्री आहे. आपल्या महाराष्ट्रात रामटेकला संस्कृत तर वध्र्याला हिंदीचे केंद्रीय विद्यापीठ आहे, तर मग मराठी विद्यापीठ का नको? ते होणे आवश्यक आहे. ते स्थापन करून योजनाबद्ध रीतीने काम केले तर, मराठी ही ख-या अर्थाने ज्ञानाभाषा होऊ शकेल! तामिळ विद्यापीठाच्या धर्तीवर प्रस्तावित मराठी विद्यापीठात विविध विभाग स्थापावेत आणि

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / ३७