पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
बड़ोदे


लक्ष्मीकांत देशमुख
यांचे
अध्यक्षीय भाषण
एक
प्रास्ताविक

 उपस्थित मान्यवर आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या व शतकाची भव्य परंपरा असणाऱ्या शारदोत्सवरूपी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंढरीच्या वारीत निष्ठेने सामील होणाऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्याप्रमाणे या साहित्य पंढरीत शारदेच्या - सरस्वतीच्या ओढीने उपस्थित असणाऱ्या रसिक मित्रांनो !
ठळक मजकूर

 सर्वप्रथम मी बडोद्याचे - वडोदराचे भाग्यविधाते व थोर कर्ते समाजसुधारक तिसरे सयाजीराव महाराज गायकवाड यांना अत्यंत विनम्रपणे अभिवादन करतो. काही वर्षांपूर्वी मी राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात प्रशासकीय नोकरीनिमित्त जिल्हाधिकारी म्हणून साडे-तीन वर्षे होतो. त्या महाराष्ट्राला ललामभूत ठरलेल्या कर्त्या समाजसुधारकांचा आशीर्वाद घेऊन या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून बडोद्याला येताना माझ्या मनात ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या सयाजीराव गायकवाड महाराजांबाबत कृतज्ञतेची भावना आहे. आज आपला महानतम असा भारत देश एकविसाव्या शतकात एक जागतिक सत्ता म्हणून वेगाने वाटचाल करीत असताना त्याची भरभक्कम पायाभरणी ज्या महापुरुषांनी केली, त्यात सयाजी

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / १