पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 यशवंतराव चव्हाणांच्या भाषेच्या संदर्भातील हे मूलगामी विचार वास्तवात आणण्याचे काम त्यांच्यानंतर महाराष्ट्रात त्या चैतन्याने व हिरिरीने झाले नाही. सर्वच सरकारनी मराठी ही शिक्षणाची व ज्ञानाची भाषा सर्वाथाने व्हावी यासाठी प्रेमाने झटून ब एक ध्येय म्हणून फारसे प्रयत्न केले नाहीत. आजची मराठी अवस्था त्यामुळेच विदारक म्हणली पाहिजे.
 मातृभाषेत प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे, पण दोनशे वर्षांच्या इंग्रजी राजवटीमुळे व भारतात प्रचलित असणा-या २२ घटनासंमत राष्ट्रभाषांमुळे आणि मुख्य म्हणजे भाषिक राजकारणामुळे मातृभाषेपेक्षा इंग्रजी शिक्षणाला आजवर प्राधान्य मिळत आले आहे. या संदर्भात २९ नोव्हेंबर १९७२ रोजी लोकसभेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अत्यंत अभ्यासू भाषण केले होते, ते भारताच्या सर्वच राज्यातील भाषेच्या संदर्भात लागू होणारे होते. ते मराठीच्या संदर्भात विचार केला तरी महत्त्वाचे आहे, म्हणून अटलजींच्या त्या गाजलेल्या भाषणातील काही उतारे त्यांच्या मूळ हिंदीत देतो व मग पुढील विवेचन करतो.
 “हर बच्चे को अपनी मातृभाषा में प्राथमिक शिक्षा प्राप्त करने का अधिकार है, लेकिन इस अधिकार पर कही अमल नहीं हो रहा हैं।'
 ‘अंग्रेजी को अनंतकाल तक बनाये रखने की बात हो रही है। अगर हम भारतीय भाषाओं का संघर्ष समाप्त नही करेंगे तो केवल अंग्रेजी लाभ उठायेगी । अग्रजीद्वारा लायी गयी एकता राष्ट्रीय एकता नहीं होगी, जनता की एकता नहीं होगी। बह दो ढाई प्रतिशत अंग्रेजी बोलनेवालोंकी एकता होगी। अगर हम को सचमुच भावनात्मक एकता लानी है, तो वह केवल भारतीय भाषाओं द्वारा आ सकती हैं।

 आज २०१८ मध्ये महाराष्ट्रातील मातृभाषेतील शिक्षण आणि मराठी ज्ञानभाषा होणे याचा विचार केला, तर ना आपण यशवंतराव चव्हाणांचा विचारे मानला की अटल बिहारी वाजपेयींचा. आज इंग्रजीची मराठीसह एकूणच भारतीय समाज जीवनात एवढी घट्ट पाळेमुळे रोवली आहेत वे पद्धतशीरपणे अशी वेळ आणली गली आहे की, इंग्रजी अपरिहार्य वाटावी व तिच्यातून शिक्षण घेण्यासाठी पालकांची मानसिकता ब्रेनवॉश केल्याप्रमाणे भारित केली जावी.... एकेकाळी राम मनोहर लोहियांनी 'अंग्रेजी हटाव'चा नारा दिला होता, त्याचा आज खुद्द त्यांच्या अनुयायांनाही विसर पडला आहे.आणि भारतीय समाजमनानं तर त्या घोषणेची टवाळी करत तिला हास्यास्पद करून टाकत सारा देश इंग्रजीचा ‘भाषिक गुलाम' खुशीखुशीन होण्याच्या मार्गावर आगेकूच करत चालत आहे. त्यामुळे आज मातृभाषेतून शिक्षण हे कसे नैसर्गिक व मुलांच्या आकलन व अभिव्यक्तीसाठी महत्त्वाचे आहे, हे जगभरचे शिक्षणशास्त्रज्ञ सांगत असले तरी, भारतीय पालक, त्यात मराठी पालकही आला - तो हे ऐकण्याच्या आज च नजिकच्या भविष्यात तरी

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / ३३