पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


याद्वारे साहित्यिकांचं राजकारण हे क्षेत्र नाही, असं त्यांना सांगायचं असतं! त्यांना आज मला हे या पवित्र मंचावरून सांगू द्या की, केवळ कला व सौंदर्यबोध हेच साहित्याचे प्रयोजन नाही, तर वास्तव दर्शन आणि भविष्यसूचन हेही साहित्याचं सामाजिक प्रयोजन आहे. लेखक-कवी जेव्हा माणसाच्या दु:ख, वेदना आणि शोषणाची कहाणी सांगत असतो व त्याचा आवाज बनत असतो, तेव्हा ज्या व्यवस्थेमुळे हे दु:ख होतं, त्यावर तो भाष्य करीत असतो. व्यवस्था-सिस्टीम जी राजकीय, सामाजिक व प्रशासकीय यंत्रणा नियंत्रित करतो आणि प्रसंगी सामान्य माणसाची कोंडी करते, त्यावरचं निर्भीड लेखन व चिंतनशील भाष्य करणारे साहित्य हे व्यापक राजकीय भाष्यच असतं! दबलेली - पिचलेली माणसं व्यवस्थेनं हतबल असतात. त्यातील काही बंडखोर होत आवाज उठवतात, व्यवस्थेला आव्हान देतात, त्यामुळे व्यवस्था काही प्रमाणात हादरते - बदलते. पण व्यवस्थेची मूळ प्रवृत्ती असते, मूठभरांचं बहसंख्य जनतेवर नियंत्रण राखणं, त्यांना दाबात ठेवणं, आपल्यावर विसंबून राहायला भाग पाडून त्यांना पंगू-कमजोर ठेवणं.... पण लेखककलावंत हे स्वभावत:च या बहुसंख्य असलेल्या 'नाही रे' वर्गाच्या, शोषितपीडितांच्या मानवी दु:खानं दूवणारे असतात आणि त्यांचं लेखन हे जी परिस्थिती माणसाला दु:ख, वेदना व शोषण देते, त्यावर प्रहार करतं आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे असे सांगतं. म्हणून त्यांचं हे व्यवस्थेवर प्रहार करणारं लेखन राजकीय असतं, व्यापक - सामाजिक असतं. म्हणून खरा जातिवंत लेखक हा राजकीय लेखकच असतो. राजकीय भाष्यकारच असतो! तो त्याला भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे.

 मित्रहो, मी ही व्यवस्थेवर प्रहार करणारा व ती बदलावी म्हणून लेखन आशारा राजकीय लेखक आहे. जेव्ही मी 'पाणी ! पाणी!!' कथासंग्रहात पाणी चाई व दुष्काळाचा मानवी नातेसंबंधावर कसा परिणाम होतो याच्या कथा लाल्या तेव्हा त्याला कारणीभूत असणा-या राजकीय नेते व नोकरशाहीच्या भ्रष्ट युतीवर कथेच्या ओघात भाष्य केलं. ते माझं राजकीय लेखनच आहे, असे मी नाना. कारण मला मानवी दु:खाला कारणीभूत असणारी निरंकुश सत्ता छ वित्रणाची राजकीय व्यवस्था मान्य नसते. म्हणूनच भाष्य करतो.... हिंदी कवी दुष्यंतकुमाराच्या 'मैं फरिश्ता हैं। सच बताता हैं।' या कवितेचा संदर्भ देत हे सांगू अच्छतो की, मीही त्याच जातकुळीचा फरिश्ता असलेला लेखक आहे व आजवर माझ्या कथा-कादंब-यातुने भ्रष्ट व्यवस्थेचं रूप नग्न करून कोरडे ओढणारं भाष्य कल आहे. ते राजकीय आहे व त्याला माझा नाइलाज आहे. मी माझ्या भवताली व माझ्या राज्यात- देशात जे घडतं आणि सामान्य माणसाच्या पदरी दारिद्रय, वंचना आणि हतबलता इथली राजकीय-सामाजिक-प्रशासकीय व्यवस्था व संस्था / पक्ष

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / १७