पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एचआयव्हीची लागण झाल्यानंतर एचआयव्ही आपल्या रक्तात शिरतो, आपल्या रक्तात पांढऱ्या पेशी असतात, ज्या आपल्या रोगप्रतिकारशक्तीचे काम करत असतात. त्यामध्ये सीडी-फोर लिम्फोसाइट्स या महत्त्वाच्या पांढऱ्या पेशी असतात. या पेशींमध्ये एचआयव्ही शिरतो व अनेक एचआयव्ही विषाणू जन्माला घालतो. माणसाची रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते. एचआयव्ही ज्या सीडी-फोर लिम्फोसाइटमध्ये शिरतो तिथे आपली नवीन पिल्लं तयार करतो आणि त्या पेशीला मारून टाकतो. असं होता होता पांढऱ्या पेशी मरू लागतात व एचआयव्हीची संख्या वाढू लागते... अंदाजे ११ वर्षांनी पांढऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात संपलेल्या असतात व एचआयव्ही खूप बळावतो. रोगप्रतिकारशक्ती नष्ट झाल्याने अनेक संधिसाधू आजार होतात व एआरंटी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी) औषधं वेळीच सुरू केली नाहीत तर आपण दगावतो.

●●●

 उंबऱ्यातून आत पाऊल टाकताना मंगलताईंना सगळं काही नवीन वाटत होतं. जणू काही एखाद्या नव्या घरात आलो आहोत. शेजारणीनं डबा दिला होता. हॉस्पिटलात, शेजारणीनं चार वेळा नर्सला विचारलं होतं. "कशानी झालं? काय झालं?" पण मंगलताईंनी निक्षून नर्सला सांगितलं, "कोणाला काहीही सांगू नका." कालपर्यंत जवळच्या वाटणाऱ्या व्यक्ती आज परक्या झाल्या होत्या.

 मंगलताई जेवायला बसल्या. बारक्याच्या ताटात पोळी-भाजी वाढली. स्वत:च्या ताटात थोडाच भात घेतला. संथपणे जेवू लागल्या. अधूनमधून बारक्या तिच्याकडे निक्षून बघत होता. ताईंचं मात्र त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. एकदम बारक्याने त्यांचं लक्ष वेधून

4