पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होता. "या ताई, बसा" मंगलताई खुर्चीवर बसल्या. धाप लागली होती. तशातच म्हणाल्या, "कधी सोडणार डॉक्टर?"

 "ताई, तुमच्या घरचं अजून कोणी आलंय का? मिस्टर, सासू, आई?" "नाही, का बरं? माझा पोरगा आलाय."

 "काय वय आहे त्याचं?"" 'आठ"

 'बरं राहू दया. मी इथला काउन्सिलर आहे. आपण तुमच्या ज्या चाचण्या केल्या त्यात दिसून आलंय, की तुम्हाला एचआयव्हीची लागण झाली आहे." "म्हणजे?'

 "म्हणजे ज्या विषाणूंनी पुढे एड्स होतो, त्याची लागण तुम्हाला झाली आहे."

 एड्स हा शब्द पोचला, पण मनाला झेपत नव्हता.

 काहीतरी बोलायची इच्छा होत होती, पण शब्द बाहेर पडत नव्हते. "पण...पण..." पलीकडच्या गल्लीतल्या सम्याबरोबर आपला संग झालाय हे त्या तरुणाला कळेल या भीतीने ताईंनी झटदिशी मान खाली घातली. त्याला आपल्या डोळ्यात सत्य दिसेल ही भीती. त्याच्यासमोर नंगं झाल्यावानी वाटत होतं.

 पुढं काउन्सिलर काय बोलला हे कळलंच नाही. त्याचं तोंड नुसतं उघडबंद होताना दिसत होतं.

  ...तो तरुण बोलत होता. शब्द कानावर येत होते, पण अर्थ काही लागत नव्हता. "तुमचं काहीतरी चुकलं असेल! परत तपासून बघा.' मंगलताईंनी विनंती केली. आता तेवढीच आशा होती.

3