पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिनेमाची गाणी बघण्यात दंग होता. "हा..हा." त्याचं लक्ष नव्हतं. "तसे आजार मला होऊ नयेत म्हणून डॉक्टरांनी मला गोळ्या दिल्यात." थोडा वेळ तो काहीच बोलला नाही. जणूकाही त्यानं ऐकलंच नाही. पण ताईंना माहीत होतं, की त्यानी नक्की ऐकलं आहे. त्या शांत बसल्या. टीव्हीवरचं गाणं संपल्यावर म्हणाला, "का? परत होईल का तो?" "होऊ शकतो." "किती दिवस गोळ्या घ्यायच्या?" "डॉक्टर सांगेल तोवर, पण बाहेर कोणासमोर बोलू नकोस नाहीतर काहीतरी भलतंसलतं गावभर उठवतील." तेवढ्यात बाहेरून शिट्टी ऐकू आली. "नाही सांगत" म्हणत तो आरशासमोर उभा राहिला. "उशिरा येईन" म्हणत केसांवरून कंगवा फिरवला. "कोणत्या पोरीच्या मागे आहेस रे?" ताईंनी विचारलं. "का? कोणी काही बोललं का?" त्याच्या आवाजात कठोरपणा होता. नक्कीच कोणीतरी आहे; या कारट्यावर लक्ष ठेवावं लागणार, मंगलताईंच्या मनात विचार आला. "पन्नास रुपये दे" तो म्हणाला. त्यानी गोळ्यांबद्दल काही खोलवर विचारलं नाही या आनंदात ताईंनी पैसे दिले.

  गोळ्या घ्यायची सवय लागली, पण पहिले दोन महिने खूप त्रास झाला. आजारापेक्षा औषधाचाच जास्त त्रास होतोय असं वाटू लागलं. एक दिवस त्रासून निमीला ताईंनी विचारलं, "आजची एक गोळी नाही घेतली तर चालेल का?" तर निमीनं भरपूर शिव्या दिल्या. जगातल्या सगळ्या शिव्या तिला ठाऊक. "तुझ्या पोराकडे बघ की, तुझा मेंदू काय xxxx का?" कुठून अवदसा आठवली अन् तिच्यापाशी बोलले असं ताईंना वाटलं. निमूट गोळी घेतली.

 दुसऱ्या महिन्याच्या गोळ्या घ्यायला गेल्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, की या गोळ्यांनी अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. त्रास कमी व्हावा म्हणून डॉक्टरांनी गोळ्या दिल्या व "गोळ्या घेणं थांबवू 244 . .