पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रोग्राम व गोळी घ्यायची वेळ एक ठेवा. म्हणजे बातम्यांची वेळ आली, की गोळी घ्यायची व मग बातम्या बघायच्या. अशा प्रकारे वेळेवर, न चुकता गोळी घ्यायची शिस्त लावा. अशा ३-४ विविध मार्गांनी स्वत:ला गोळी घ्यायची आठवण होईल याची काळजी घ्या. फक्त आपल्या स्मरणशक्तीवर किंवा एकाच मार्गावर विसंबून राहू नका. म्हणजे दिवे गेले म्हणून जरी टीव्ही चालू नसेल तरी अलार्म गोळी घ्यायची आठवण करून देईल."

मग एक डॉक्टर आले ते म्हणाले, "मी सांगतो त्या गोष्टी लक्षात ठेवा.

१. थंडी/ताप असला, जुलाब झाले तरी गोळी घेणं चुकवायचं नाही. गोळी घेऊन कितीही त्रास होत असला तरी गोळी घेणं चुकवायचं नाही. २. उपास/रोजा असेल तरी गोळी घेणं चुकवायचं नाही.

३. एखादी गोळी घ्यायची वेळ चुकली व उशिराने आठवण झाली, की लगेच घ्या. उदा., सकाळची ८ची गोळी चुकली व १२ वाजता लक्षात आलं तर लगेच १२ वाजता ती गोळी घ्या. दुसऱ्या दिवशीची गोळी नेहमीच्या वेळेवर घ्या.

४. जर पूर्ण एक दिवस गोळी चुकली तर पुढच्या गोळ्या नेमाने घ्यायला लागा. पुढच्या खेपेस दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांना सांगा.

५. गोळी घेतल्यावर उलटी झाली तर? जर गोळी खाल्ल्यावर अर्ध्या तासात उलटून पडली तर परत एकदा पूर्ण गोळी घ्या. जर गोळी खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानंतर उलटून पडली तर परत ती गोळी घ्यायची आवश्यकता नाही.

६. जर एचआयव्ही संसर्गित लहान मूल औषध घेत नसेल तर- घरी बर्फ असेल तर एक छोटा बर्फाचा तुकडा लहान मुलाच्या तोंडात चोखायला दयावा. त्यानी तोंडाच्या चवीच्या पेशी बधिर होतात व मग औषधाची कडू चव कळत नाही. 191