पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संजीवनी
एआरटी औषधं
(अँटिरेट्रोव्हायरल थेरपी)
कथा: बिंदुमाधव खिरे

 

तांत्रिक माहिती: डॉ.रमण गंगाखेडकर'

 

"समपथिक" ट्रस्ट, पुणे या संस्थेने 'एआरटी' अँटिरेट्रोव्हायरल थेरपी या विषयावर डॉ. रमण गंगाखेडकर (डेप्युटी डायरेक्टर, डिव्हिजन ऑफ क्लिनिकल सायन्स, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन) यांच्या व्याख्यानावर आधारित समपथिक ट्रस्टचे बिंदुमाधव खिरे, टिनेश चोपडे, विवेक तिगोटे, परीक्षित शेटे, करुणदीप जेटीथोर, उमेश कांबळे, अमोल शिंदे यांनी ही पुस्तिका तयार केली आहे. डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. नितीन साने व काउन्सिलर मेघना मराठे यांनी पुस्तक वाचून मोलाच्या सूचना केल्या. चंद्रशेखर बेगमपुरे यांनी डीटीपीचे काम पाहिले. माधुरी चव्हाण यांनी व्याकरण व शुद्धलेखन तपासले.

महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेचे अधिकारी अवशरण मॅडम, दीपक निकम, डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेन्शन ॲन्ड कंट्रोल युनिटचे सचिन पवार यांचे आम्हाला सतत मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेनी दिलेल्या एचआयव्ही/एड्स हस्तक्षेप प्रकल्पाच्या निधीतून (PMC, PCMC चे MSM TI) ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.

या पुस्तिकेतून एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना योग्य ती माहिती व प्रेरणा मिळेल, ही आशा करतो.

"बिंदुमाधव खिरे"

संस्थापक

समपथिक ट्रस्ट, पुणे

मार्च २०१३

विशेष टिपणी: या पुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग क ही प्रमाणात प्राथमिक माहिती असावी एवढाच आहे. एचआयव्ही/एड्स निदान व उपचार अॅलोपथिक डॉक्टरांकडूनच केले जावेत.