पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते फडकं तोंडावर पाहिलं तर सर्व वस्ती वाळीत टाकायची. एका दुखण्याबरोबर इतर शंभर भानगडी सांभाळाव्या लागतात. बारक्याला खोकल्यातून लागण व्हायला नको म्हणून त्याला जास्तीत जास्त वेळ बाहेर पाठवू लागल्या. त्याला काय तेच हवं होतं.

 मालकिणीचं देणं बाकी होतं. घरी बसायचा अपराधीपणा वाटत होता. पण काय करणार? तरी एक बरं, बारक्या संध्याकाळी जवळच्या एका वर्कशॉपमध्ये २ तास जात होता. पडेल ते काम करत होता. तेवढेच दोन रुपये पदरी पडत होते. सुरुवातीला जायला नाराज होता, पण नंतर आपण कमावतोय म्हणजे आपलाही पैशांवर अधिकार आहे हे जाणवायला लागल्यावर आवडायला लागलं.

क्षयरोग (टीबी)
  • जर एक महिन्याच्यावर खोकला चालू असेल, खोकताना बेडकं/रक्त पडत असेल तर सरकारी दवाखान्यात जाऊन क्षयरोगाची चाचणी/तपासणी करून घ्या.
  • क्षयरोगाचे वेळेवर निदान करून व नियमित 'डॉट्स' औषधं घेऊन क्षयरोग पूर्ण बरा होतो.
  • क्षयरोगावरची डॉट्सची औषधं मोफत आहेत.
  • औषधांचा कोर्स पूर्ण करा. बरं वाटयला लागलंय म्हणून औषधं अर्धवट सोडू नका. औषधं अर्धवट सोडली तर औषधांना दाद न देणारा मल्टी ड्रग रेझिस्टंट टीबी (एमडीआर टीबी) होऊ शकतो आणि त्यामुळे पेशंट दगावण्याची शक्यता खूप वाढते.

 

●●●

.158