पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नोंदणी व चाचण्या

आपल्याला एचआयव्हीची लागण झाली हे कळल्यावर सर्वांत आधी एआरटी औषधांसाठी नोंदणी करा. नोंदणी लवकरात लवकर करा.

नोंदणीचे प्रकार

  तुम्ही सरकारच्या एआरटी केंद्रावर नाव नोंदवू शकता किंवा तुम्ही खासगी (एचआयव्हीबद्दल जाणकार) डॉक्टरांकडूनही औषधं घेऊ शकता.

सरकारची एआरटी केंद्रे

जवळच्या सरकारी एआरटी केंद्रामध्ये तुम्ही नोंदणी करावी.

सरकारकडून एआरटी औषधं मोफत मिळतात.

एआरटी औषधं सुरू झाली, की दर महिन्याला एकदा या केंद्रात जाऊन एक महिन्याच्या गोळ्या घेऊन याव्या लागतात. त्याचबरोबर एआरटी सुरू करण्याआधीच्या आणि त्याचा होत असलेला परिणाम पाहण्याच्या सर्व तपासण्यादेखील मोफत होतात.
नोंदणीसाठी घेऊन जायची कागदपत्रे

 

● एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे हे दाखवणारा चाचणीचा रिपोर्ट
● दोन फोटो
● तुम्ही राहता त्या पत्त्याचा दाखला. (उदा., रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, इत्यादी. जरी असा दाखला उपलब्ध नसला तरी नोंदणी करण्यास एआरटी केंद्रात जाऊन त्यांचा सल्ला घ्या.)

● नोंदणी करायला जाताना बरोबर एका नातेवाइकाला/मित्राला घेऊन जा.

9 मल