पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संगीत सौभद्र नाटक.

अंक १ ला.

नान्दी.

सूत्रधार -
  [ राग भूप - ताल त्रिताल.]

नमुनि ईशचरणा || करिन मग मजाननाच्या पादस्मरणा || नमु० || ध्रु० ||
सुकविरत्नमाला || अतिशोमा दे यदीय सुंदर वृक्षाला || जिच्यामध्ये महामणी प्रकाश पाडित सुवर्णपदकी बसोनियां कालिदास राणा || नमु० ||


  [ नमामि माहिषासुरमर्दिनी, या चालीवर. ]

तुह्मां तो शंकर सुखकर हो || हिमघरास्थित विकट काननिं तप करी प्रियकरी शुभकरी सुंदरी तिजवरी भुलत निज कैलासनगिं तो || शंकर सुखकर हो || ध्रु० || पद्मजा मुररिपुसही अवमाजुनी इंद्रा चंद्रा सकलां सोडुनी पर्णनी कुंदरदनि सुकुंतलावेणी जाहली शिवब-


१ भयंकर, २ ब्रह्मदेवास. ३ विष्णु. ४ विवाहाकरिता. ५ कुंदाप्रमाणे शुभ्र आहेत दंत तिचे. ६ कुरळ्या केसांची व्यक्ती.