पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(३)

लापेक्षांही या नाटकांत ग्रंथकर्त्याच्या कवित्वशक्तीचे तेज विशेष चमकते. रा. रा. अण्णासाहेबांच्या कल्पनाचातुर्याची झांक यात बरीच दिसून येत आहे; पात्रांच्या अनुरोधानें या नाटकातील विषयाची योजना झाल्यानें या नाटकाचा प्रयोग उत्तम वठतो, व त्यांतील रसाचा आस्वाद कितीही घेतला तरी वीट आणीत नाहीं, या गोष्टी साधारणत: सर्वांना मान्य आहेत.

 सुभद्राहरण हें चरित्रच आमच्या स्त्रीपुरुषसमाजाच्या प्रीतीतले आहे; त्यात रा. रा. अण्णासाहेबांनी ते "पुनर्बुभुक्षाकरणी" आपल्या कल्पनाशक्तीने नवीन गोष्टींचा मालमसाला घालून "तिखटची केले". मग ते लोकांना कां प्रिय होऊ नये? सुभद्रेची करूण रसप्रधान पद्ये अबालवृद्धांच्या तोंडून, तालासुरांच्या नियमांवर विशेषसा जुलूम न होतां ऐकूं येऊं लागलीं आहेत; तेव्हां हे एक नवीनच करमणुकीचे साधन रा. रा. किर्लोस्करांच्या कृपेनें आम्हास मिळालें याबद्दल त्यांचे उपकार मानणें वाजवी आहे. संगीत वैगेरे जनमनआल्हादनाची जी साधने त्यांचा आजपर्यंत असभ्यतेशी नित्यसंबंध जडल्यासारखे दिसत होतें, ती पुन: शुद्ध होऊन सभ्य समाजाला लाभतील असें दिसत आहे.