पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(२)

सुभद्राविवाहाचा इतिहास सर्व प्रकारें ठीकसा वाटल्यानें यथामति त्यास नाटकरुप देऊन हे संगीत सौभद्र नाटक तयार केलें. नाटकाचे निबंध पुष्कळ आहेत; तिकडे जितके देखवेल तितकें लक्ष देऊन याची रचना केली आहें. किती एक ठिकाणीं इंग्लिश पद्धतीवरही यांत रस आले आहेत. सारांश, नाटक स्वतंत्र रीतीने तयार न होतां अनुकूल असणाऱ्या मंडळांकडे पाहून रचिलें असल्यांमुळें सुज्ञ रसिक यांतील, दोषांकडे दृष्टी न देतां, अल्प गुणांचा बहुमान करतील अशी आशा करतों.

ग्रंथकर्ता


दुसऱ्या व पुढील आवृतींची प्रस्तावना.

 संगीत शाकुंतलाप्रमाणे हेंही नाटक विद्वान व रसिक जनांच्या पसंतीस उतरले आहे किंवा नाही, याची प्रचीति प्रत्यक्षानुभवावरून हजारो लोकांना मिळाली आहे व मिळत आहे. पुण्यासारख्या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस प्रयोग होऊन देखील अजून प्रयोगविद्वक्षूंच्या झुंडीच्या झुंडी थिएटरच्या दारावर प्रयोगाच्या रात्रीच्या येऊन धडकतात. संगीत शाकुंत-